मिनी आणि वाढदिवस भेट
मिनी मधमाशी अणि डिम्पी फुलपाखरू एक जंगलात एकत्र राहत होते. डिम्पी खुप सुन्दर होती, पण तिला आपल्या रुपाचा खुप गर्व होता. तिचे पंख गुलाबी रंगाचे होते. ती त्यांना दाखवत जंगलभर फिरायची.
पण मिनी मधमाशिचे पंख खुप छान नव्हते ती डिम्पीसारखी आकर्षक नव्हती. मिनीला नेहमी वाटायचे की तिला का नाही असे सुन्दर पंख मिळाले ? डब्बू वाघाचा वाढदिवस जवळ आला होता, तो जंगलाचा राजा होता. त्याने दवंडी पिटावली की जो कोणी त्याला सर्वात चांगली भेट आणून देईल त्याला बक्षिस दिले जाइल. वेळ न दवाड़ता सर्व प्राण्यांनी कामाला सुरुवात केली.
मिनीने विचार केला की आपण राजाला फुलांमधुन मध जमा करुन देऊ, पण इकडे डिम्पीलासुद्धा एक कल्पना सुचली की आपण राजाला आपले पंख भेट देउया, मग राजा खूश होउन आपल्याला खुप सारी बक्षिसे देईल. मग डिम्पी चिंकी उन्दराकडे गेली अणि म्हणाली की कृपया माजे पंख तुज्या धारदार दाताने कापून टाक. चिंकिने तिला खुप समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिने ऐकलेच नाही, ती फ़क्त बक्षिसाचाच विचार करत होती. नाइलाजाने त्याने तिचे पंख कापले.
आता ती खुपच कुरूप दिसायला लागली तिला उड़तासुद्धा येत नव्हते. तिचे सारे सौंदर्यच नष्ट जाले. तिला मात्र वाटत होते की तिचे पंख थोड्याच दिवसात परत येतील आणि राजाकडून बक्षिससुद्धा मिळेल.
बोलता बोलता राजाचा वाढदिवस जवळ आला. सर्व प्राणी ठरलेल्या जागी आले, डिम्पी आणि मिनी सुद्धा आली. सर्वांनी राजाला भेटी दिल्या. डिम्पीनेसुद्धा राजाला आपले पंख भेट दिले पण राजा म्हणाला "मी या पंखांचे काय करू ? हे तर फुलांवर उड़तानाच छान दिसतात, हे माज्या उपयोगाचे नाहीत." हे ऐकून डिम्पीला धक्काच बसला तिने लोभापायी तिचे सौंदर्य गमावले होते अणि तिला बक्षिसही मिळाले नाही. ती आता रडायला लागली.
इकडे मिनीने खुप सारा मध आणला होता, राजानी मध खाल्ला आणि त्याला तो खुपच आवडला तो मिनीला म्हणाला " यापूर्वी मी कधीच असा पदार्थ खाल्ला नव्हता, हे काम फक्त तूच करू शकते आणि तू खुप कष्ट केलेस यासाठी तुलाच बक्षिस मिळाले पाहिजे." मग सर्व प्राण्यांनी मिनीची खुप स्तुति केली.
मिनीला राजानी खुप सारी बक्षिसे दिली. मिनी आता खुपच खूश होती.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment